Thane Accident News | ठाण्यात भरधाव डंपरने दुचाकीला चिरडले, क्राईम ब्रांचच्या पोलीस कर्मचाऱ्यासह महिलेचा मृत्यू

0

ठाणे : – Thane Accident News | ठाण्यात बुधवारी (दि.12) सकाळी भीषण अपघात झाला आहे. डंपरच्या धडकेत ठाणे क्राईम ब्रँचच्या (Thane Crime Branch) पोलीस कॉन्स्टेबलचा (Thane Police) मृत्यू झाला आहे. तसेच आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.हा अपघात ठाण्यातल्या वर्तकनगरमधील (Vartak Nagar Thane) कोसर भागात झाला आहे. या अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात (Vartak Nagar Police Station) करण्यात आली आहे.

वर्तकनगर येथील कोरस भागात ठाणे क्राईम ब्रांचचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रावते Sunil Ravte (वय-44) यांच्या अंगावरून डम्पर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर, त्यांच्या सोबत दुचाकी चालविणाऱ्या महिलेचाही मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव डंपरने दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातानंतर दुचाकीवरील दोघेही खाली पडले. डंपरने चिरडल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

वर्तकनगर भागात सुनील रावते हे कार्यरत आहेत. ते ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनीटमध्ये कार्यरत होते. बुधवारी सकाळी ते एका महिलेच्या दुचाकीवरून खासगी कामासाठी जात होते. त्याचवेळी डंपरच्या चाकाखाली आल्याने सुनील रावते आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही. सुनील रावते यांच्या पश्चात पत्नी आणि मुले असा परिवार आहे. रावते यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.