Maha Vikas Aghadi | अखेर मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांचा अर्ज मागे

0

मुंबई: Maha Vikas Aghadi | लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी संपल्यानंतर विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील जवळपास प्रत्येक पक्षानं आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये युती आणि आघाडी धर्म पाळला गेलेला नाही. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज मागे घेणार? हे पाहणं उत्सुकतेचे होते.

कोकण पदवीधर मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर जैन यांनी अर्ज मागे घेतला आहे. तसेच या मतदार संघातून अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अमित सरैया यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या दोन्ही उमेदवारांकडून काँग्रेस उमेदवार रमेश कीर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. असेच चित्र महायुतीतही पाहायला मिळाले आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय मोरे यांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर असा थेट सामना रंगणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश सोनावणे यांना फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं. तसंच नाशिक पदवीधरमधील काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनीही माघार घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत किंवा महायुतीत सध्यातरी सर्व काही आलबेल असल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.