Amol Kirtikar On Mumbai Lok Sabha Results | न्यायदेवता मला नाय देईल; अमोल कीर्तिकरांनी व्यक्त केला विश्वास

0

मुंबई: Amol Kirtikar On Mumbai Lok Sabha Results | मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या घडामोडी घडल्या. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) उमेदवार अमोल किर्तीकर यांचा निसटता पराभव झाला.

मात्र या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निकालाच्याच दिवशी तक्रार दाखल केली होती आणि ईव्हीएम मशीनमधील मतदानाची फेर मोजणी करण्याची मागणी केली होती.

तसेच उत्तर पश्चिमच्या निकालावरुन उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतींकडे देखील तक्रार दाखल केली आहे. अमोल किर्तीकर यांनी याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही सांगितले आहे.

निवडणूक यंत्रणा जरी सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेली असली तरी न्यायदेवता मला न्याय देईल अशी भावना अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली आहे. मतमोजणी प्रक्रियेत त्रुटी असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.