Ajit Pawar | अजित पवारांसमोर मोठे धर्मसंकट? राज्यसभेचे तिकीट मुलाला, पत्नीला की अन्य…?, उमेदवार ठरेना

0

बारामती: Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेसाठीही २५ जून रोजी पोटनिवडणूक होत आहे त्यामुळे याठकाणी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.

केरळ आणि महाराष्ट्रातील मिळून चार जागांसाठी २५ जून रोजी राज्यसभेच्या निवडणुका होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली. यामध्ये निवडणूक पॅनेलने म्हटले की केरळमधील तीन राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. तेथील विद्यमान खासदार एलराम करीम, बिनॉय विस्वम आणि जोस के मणी हे तिघेही १ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत.

याशिवाय, वरिष्ठ सभागृहात पुन्हा निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेसाठीही २५ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेचा सामना करत असताना पटेल यांना राज्यसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे केले होते. त्यात ते जिंकले आणि त्यांना राज्यसभेची जागा मिळाली. त्यामुळे आता त्यांच्या जागी रिक्त पदावर कोणाला संधी मिळणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.

मात्र मुलगा, पत्नी की अन्य कोणाला राज्यसभेवर संधी द्यायची असा प्रश्न अजित पवारांसमोर उभा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान या जागेसाठी पार्थ पवार (Parth Pawar), सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि पक्षातील काही नेतेही उत्सुक आहेत त्यामुळे ही संधी नेमकी कोणाला द्यायची याबाबत अजित पवारांसमोर मोठे धर्मसंकट आहे. पार्थ पवार यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून पराभव झाला होता तर सुनेत्रा पवार यांचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून पराभव झाला आहे.

आता या जागेतून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्रवादी पक्षाकडूनच ठराव करून सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेण्याची मागणीही पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.