Viman Nagar Pune Crime News | पुणे : भेटवस्तू परत करण्यास नकार, मैत्रिणीला व तिच्या वडीलांना मारहाण

0

पुणे : – Viman Nagar Pune Crime News | मैत्रिणीला दिलेल्या भेटवस्तू परत मागण्यासाठी गेलेल्या तरुणाने मैत्रिण आणि तिच्या वडीलांना मारहाण केली. यामध्ये तरुणीचे हाताचे बोट फ्रॅक्चर झाले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास लोहगाव (Lohegaon) येथे घडला आहे. याप्रकरणी मारहाण व धमकावल्या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 55 वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन कुलदिप बिरबल भदोरीया Kuldeep Birbal Bhadoria (वय-28 रा. वृंदावन पार्क, लोहगाव) याच्यावर आयपीसी 325, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीची आणि आरोपी कुलदिप यांच्यात मागील पाच वर्षापासून मैत्री आहे.

मित्र-मैत्रिण असताना कुलदिप याने तरुणीला काही भेट वस्तू दिल्या होत्या. मात्र, त्यांच्यात वाद झाल्याने शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास कुलदिप भेटवस्तू मागण्यासाठी फिर्यादी यांच्या घरी आला. मी दिलेल्या वस्तु मला परत द्या असे त्याने मुलीला व फिर्यादी यांना म्हणाला. त्यावेळी फिर्यादी यांनी आमच्याकडे तुझ्या काही एक वस्तु नाहीत असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने दोघांना अश्लील शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या मुलीच्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाल्याने ती जखमी झाली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अल्पवयीन मुलाला मारहाण

हडपसर : पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला बोलावून त्याला सार्वजनिक शौचालयाच्या वरती नेऊन लोखंडी वस्तूने बेदाम मारहाण केली. यामध्ये मुलगा जखमी झाला असून हडपसर पोलिसांनी सचिन दत्ता समींनदर (वय-26 रा. म्हाडा सोसायटी, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याप्रकरणी जखमी मुलाच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.