Sharad Pawar On PM Narendra Modi | “गेल्या पाच वर्षांत एक-दोन व्यक्तींनीच सरकार चालवलं”; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

0

पुणे: Sharad Pawar On PM Narendra Modi | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापनदिन आज मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. महत्वाचे म्हणजे हा वर्धापन दिन राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही गटाकडून साजरा केला जातोय. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वतीनं पुण्यातील पक्ष कार्यालयात ध्वज फडकवण्यात आला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. “गेल्या पाच वर्षांत एक-दोन व्यक्तींनीच सरकार चालवलं” असे म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

पवार म्हणाले की, “गेल्या पाच वर्षांत दोन व्यक्तींनी सरकार चालवलं. त्यांनी देशाचा व्यापक विचार केला नाही. मात्र, सुदैवानं देशातील जनतेनं याची नोंद घेऊन त्याप्रकारे मतदान केलं. एक-दोन लोकांच्या हातात अधिकार होते. त्याला मर्यादा आणण्यात आल्या. मात्र, असं असलं तरी अद्यापही सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं नाही. पण त्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. तसंच लवकरच या घडामोडी संपूर्ण देशाला बघायला मिळतील.

मागील २५ वर्ष आपण विचारधारा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आता मजबुतीनं आपण सर्व हा पक्ष आणखी पुढं घेवून जाण्यासाठी प्रयत्न करुया. तीन महिन्यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येईल. त्यामुळं आता एकच लक्ष, ते म्हणजे तीन-चार महिन्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हातात असेल, अशी भूमिका घेऊ. या सत्तेचा उपयोग जास्तीत-जास्त लोकांना शेवटच्या घटकांपर्यंत कसा होईल, याची देखील आपण काळजी घेऊ,” असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.