Ramtekadi Pune Crime News | पुणे : रामटेकडीत टोळक्याचा राडा, वाहनांची तोडफोड करुन कुटुंबावर हल्ला; जीवे मारण्याची धमकी

0

पुणे : – Ramtekadi Pune Crime News | रिक्षा चालकाला आणि त्याच्या कुटुंबियांवर धारदार शस्त्राने आणि दगडाने मारहाण करत टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ही घटना रामटेकडी येथील ठोंबरे वस्ती (Thombre Vasti Ramtekadi) येथे सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सहा आरोपीना अटक केली आहे.

कपिल दत्तात्रय तांदळे (वय-38, रा. ठोंबरे वस्ती, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय विजय उकिरडे, लड्डू उर्फ साहिल वाघेला, टिल्ली उर्फ इरफान शेख, बप्पी हेमंत दोडके, राहुल ताटे, अभिजित अशोक काकडे (सर्व रा. रामटेकडी, हडपसर) यांच्यावर आयपीसी 395, 427, 326, 324, 323,504, 506 सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी कपिल तांदळे हे रिक्षा चालक असून ते काम संपवून घरी निघाले होते. त्यावेळी त्यांच्या वस्तीत राहणारे आरोपी अजय उकिरडे आणि त्याच्या सहकार्यांनी तांदळे यांना रामटेकडी येथील लक्ष्मीमाता मंदिराजवळ अडविले. यानंतर आरोपीं अजय आणि लड्डू याने फिर्यादी यांच्या रिक्षात हॅन्डलला लावलेला मोबाइल हिसकावून घेतला. तर इरफान शेख, राहुल याने शर्टच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेत असताना फिर्यादी यांनी त्याला प्रतिकार केला. याचा राग आल्याने फिर्यादी यांच्या तोंडावर दगड मारुन जखमी केले.

फिर्यादी हे रिक्षा घेऊन तुमची तक्रार पोलीस ठाण्यात देणार असे सांगून निघाले. याचा आरोपींना राग आल्याने फिर्यादी यांच्या रिक्षाच्या मागे पळत येऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी, चारचाकी, तीनचाकी वाहनांवर दगड, विटा, पेव्हर ब्लॉक व फरशीचे तुकडे मारुन तोडफोड करुन नुकसान केले.

यानंतर फिर्यादी हे घरी गेले असता आरोपी उकिरडे, लड्डू, अभिजित काकडे आणि इतर त्यांच्या मागे गेले आणि त्यांना मारहाण करू लागले. हे पाहून फिर्यादी यांच्या कुटुंबातील सदस्य हे भांडणे सोडवण्यासाठी खाली आले. आरोपींनी त्यांना देखील धारधार शस्त्र, दगड, विट्टाणी मारहाण केली. यात फिर्यादी त्यांचा भाऊ किरण, अभिषेक, मुलगा हर्षवर्धन जखमी झाला. यानंतर आरोपीने परिसरात दहशत माजवत आम्ही या वस्तीतले भाऊ आहोत, आमचे नादाला कोणी लागायचे नाही, कोणी मध्ये आले तर त्याची विकेट पाडू असे धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदलिंग करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.