Pravin Darekar On Shrirang Barne | आमचे 105 आमदार असूनही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत; बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त

0

पुणे: Pravin Darekar On Shrirang Barne | मंत्रिपदावरून भाजपाने दुजाभाव केल्याबाबत भाजपावर शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली होती. यावरून आता बारणे आणि भाजपा नेते प्रवीण दरेकर यांच्यात जुंपली आहे. (BJP Vs Shivsena)

दरम्यान माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त करत बारणे म्हणाले, “देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांचं मंत्रिमंडळ स्थापित झाले आहे. या निवडणुकीचा जर विचार करता शिवसेना पक्ष जुना साथी आहे. एनडीएचा जुना साथी म्हणून शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्री पद मिळावे ही माफक अपेक्षा होती.

चंद्राबाबू नायडू यांचे सोळा खासदार निवडून आले, त्याचबरोबर नितेश कुमार यांचे 12 खासदार निवडून आले. त्या खालोखाल शिवसेना पक्षाचे सात खासदार निवडून आले. चिराग पासवान यांचे पाच खासदार निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. कुमारस्वामी यांचे दोन खासदार कर्नाटकातून निवडून आले, त्यांना एक कॅबिनेट मंत्रिपद दिले.

त्याचबरोबर बिहार मधून जितन मांझी एकटे निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. तर शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री मिळावे, अशी आमची अपेक्षा होती. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ आमच्या खासदाराने घेतली असती तर आम्हाला समाधान मिळाले असते”, असे श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

यावर आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी बारणेंवर निशाणा साधला आहे. आमचे १०५ आमदार असताना राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले अशी संतप्त प्रतिक्रिया दरेकरांनी दिली आहे.

दरेकर पुढे म्हणाले, “आपण एका विचारधारेवर हिंदुत्वाच्या भूमिकेवर एकनाथ शिंदेंसोबत युती केली. त्याचे सूतोवाच श्रीकांत शिंदे यांनीही केले आहे. जागांसाठी आपण एकत्र आलो नाही. तशीच भूमिका बारणे आणि सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे. महायुतीतील अंतर्गत गोष्टी जाहीरपणे न बोलता चार भिंतीत पक्षाच्या व्यासपीठावर बोलाव्यात अशी अपेक्षा सर्व महायुतीतील नेत्यांची प्रवक्त्यांची आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता बारणे बोलतायेत. त्यांच्या निवडणुकीत भाजपा आमदार प्रशांत ठाकूर आणि इतर कार्यकर्त्यांनी कशारितीने काम केले हेदेखील बारणेंना माहिती आहे. त्यामुळे आता बोललं तरी काय फरक पडतो, ५ वर्ष मी खासदार आहे अशा भूमिकेतून बोलणं योग्य नाही” असं दरेकरांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.