Otur Pune Crime News | नशेसाठी ज्येष्ठाचा खून, पुणे ग्रामीण पोलिसांकडून तिघांना अटक; चार अल्पवयीन मुले ताब्यात

0

पुणे : – Otur Pune Crime News | नशेसाठी ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल संच चोरून खून केल्याची घटना ओतूर येथील कांदा मार्केटमध्ये (Otur Onion Market) शनिवारी (दि.8) घडली होती. ज्येष्ठ नागरिकाचा खून करणाऱ्या करणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) गुन्हे शाखेने (Pune LCB) अटक केली आहे. तर चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे (Murder In Otur Pune).

नवाब अहमद शेख (वय 72, सध्या रा. ओतूर ता. जुन्नर)असे खून झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. विलास बाबा वाघ (वय 20), प्रकाश बाबा वाघ (वय 19), भीमा गणेश हिलम (वय 25, तिघे रा. कन्या शाळेजवळ, ओतूर ता. जुन्नर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत शेख यांचा मुलगा शादाब नवाब शेख (वय 42, रा. निमोण तास, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नबाब शेख ओतूरमधील कांदा बाजारात मजुरी करायचे. शनिवारी शेख ओतूर कांदा बाजारात मृतावस्थेत सापडले. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. तेव्हा त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने व ओतूर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने तपास सुरू केला. ओतूर बाजार आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. शेख यांचा खून होण्यापूर्वी बाजार आवारात सातजण संशयास्पद फिरत असल्याचे चित्रीकरणात दिसून आले. पोलिसांनी तपास करून आरोपी वाघ, हिलम यांच्यासह चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. नशा करण्यासाठी त्यांनी शेख यांचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला. शेख यांनी विरोध केल्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींकडून चोरी केलेले दोन मोबाईल जप्त केले आहे. आरोपींनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्ह्यात आयपीसी 396, 120(ब) कलम वाढवण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक लहू थाटे, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस अंमलदार दीपक साबळे, राजू मोमीन, अतुल डेरे, संदीप वारे, अक्षय नवले, अक्षय सुपे, महेश पठारे, देविदास खेडकर, ज्योतीराम पवार, बाळशिराम भवारी, नदीम तडवी यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.