Bibvewadi Pune Crime News | पुणे : झुम अॅपवरुन भाड्याने घेतलेल्या थार गाडीची धुळ्यात विक्री, 14 लाखांची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल

0

पुणे : – Bibvewadi Pune Crime News | झुम अॅपवरुन (Zoom App) भाड्याने घेतलेल्या कारची धुळ्यात विक्री करुन महिलेची 14 लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कारची विक्री करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 मे 2024 रोजी सायंकाळी चार वाजता गगनविहार सोसायटी बिबवेवाडी (Gagan Vihar Bibvewadi) येथे घडला आहे.

जगन्नाथ खुडे (वय-27 रा. काळुबाई नगर, केसनंद फाटा, वाघोली), गणेश पगारे, दिलीप उर्फ बंटी चौरे यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पूनम सुमीत मुंद्रा (वय-39 रा. गगन विहार सोसायटी. बिबवेवाडी-लुल्लानगर रोड, पुणे) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीची महिंद्रा कंपनीची थार ही मोटार आहे. ती झूम अॅपच्या माध्यमातून ती भाडेतत्त्वावर देण्यात येते.आरोपी जगन्नाथ खुडे याने झुम अॅपवर गाडी बुक केली. फिर्यादी यांनी विश्वासाने खुडे याच्याकडे 14 लाख रुपये किमतीची थार गाडी दिली. त्यानंतर खुडे याने गणेश पगारे व बंटी चौरे यांच्याशी संगनमत करुन थार गाडी धुळ्यातील जयेश गुंजाळ यांना परस्पर विक्री केली. भाड्याने गाडी घेताना दिलेल्या मुदतीत गाडी परत न देता फसवणूक केल्याने फिर्यादी यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बनावट मेल पाठवून 10 लाखांचा गंडा

मुंढवा : कंपनीच्या नावाने बनावट मेल पाठवून बावधन येथे राहणाऱ्या एका व्यक्तीची 10 लाख 36 हजार 872 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी विनय ओंकारनाथ कौल (रा. बालेवाडी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 14 ते 20 मे या कालावधीत ऑनलाईन घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी फिर्यादी यांच्या कल्याणी पॉवर ट्रेन लि. च्या ग्राहकांना फोनद्वारे संपर्क साधला. आरोपींनी ग्राहकाला कंपनीच्या नावाने बनावट मेल पाठवून पेंडींग पेमेन्ट मागितले. ग्राहकांकडून पैसे घेण्यासासाठी स्वत:च्या बँक खात्याचे डिटेल्स देऊन त्यावर पैसे घेऊन आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.