Baner Pune Crime News | पुणे : बाणेर परिसरात आढळला मृतदेह, खुनाचा गुन्हा दाखल

0

पुणे : – Baner Pune Crime News | दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मजुराचा मृतदेह (Dead Body) आढळून आला आहे. मजुराच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला (Murder In Baner Pune). हा प्रकार बाणेर भागातील धनकुडे वस्तीत घडला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खुन करण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

नाना विठ्ठल चादर (वय-36 रा. वाकड गावठाण वाकड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत नाना याचा भाऊ सचिन विठ्ठल चादर (वय-34 रा. वाकड गावठाण, वाकड) यांनी रविवारी (दि.9) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नाना चादर हा मजुरी करतो. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. दोन दिवसांपूर्वी तो बेपत्ता झाला होता. बाणेर परिसरातील धनगुडे वस्ती येथे रविवारी सकाळी अकराच्या सुमारास एकजण मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली.

नाना चादर याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसानी अज्ञात मारेकऱ्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नाना याचा खुन कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.