Shambhuraj Desai | फडणवीस यांच्या पाठोपाठ शंभूराज देसाईंचेही मंत्रिपदापासून मुक्त करण्याचे वक्तव्य

0

सातारा: Shambhuraj Desai | राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. भाजपाला अपेक्षित यश मिळवता आले नाही. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन पराभवाची जबाबदारी स्वीकारत मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली.

अशातच आता राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शंभूराज देसाई यांनी याबाबतचे वक्तव्य केले आहे.

शंभूराज देसाई म्हणाले की, ” लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती करणार आहे. मी आमदार म्हणून संघटनेसाठी काम करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. मुख्यमंत्र्यांचा माझ्यावर विश्वास होता. मात्र तो सार्थ करू शकलो नाही,” अशी खंत शंभूराज देसाईंनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलून दाखवली.

ते पुढे म्हणाले, ” लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले विजयी झाले असे असले तरी घटलेल्या मताधिक्यामुळे माझाच पराभव झाला आहे. मंत्रिपदामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात सत्ता गेली त्यांना सुस्ती आली‌‌. त्यामुळे घटलेले मताधिक्य ही माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी अपेक्षाभंग केला आहे. उदयनराजे भोसले यांचं पाटण तालुक्यातून मताधिक्य घटल्याचं मलाही शल्य आहे.

उदयनराजे या निवडणुकीत विजयी झाले असले तरी शंभूराज देसाईंचा पराभव झाला आहे. मी खुर्चीला चिटकून बसणारा कार्यकर्ता नाही. तालुक्यातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या हितासाठी सत्ता मिळवली. ती सत्ता कार्यकर्त्याना टिकवता आली नाही. यापुढील काळात मी संघटनेसाठी काम करणार आहे.” असे वक्त्यव्य शंभूराज देसाई यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.