Rahul Gandhi On NEET | नीट परीक्षेवरून राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

0

दिल्ली: Rahul Gandhi On NEET | नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या नीट परीक्षेमधील (National Eligibility And Entrance Test) निकाल हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या संधीसाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेचे निकाल लागले आहेत.

परंतु, त्याच्यामध्ये अनेक संशयास्पद पद्धतीचे गुण दिलेले आहेत. ५ हजार केंद्रांवर साधारणपणे २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यामध्ये जवळपास ६७ मुलांना टॉप ठरवण्यात आले, सर्वांना ७२० गुण दिले गेले आहेत.

त्यातील सहा विद्यार्थी एकाच केंद्रातील आहेत. तसेच काही मुलांना ग्रेसमार्क दिले गेले आहेत. विविध राज्यांमध्ये या स्पर्धा परीक्षा म्हणजे भ्रष्टाचाराचे ठिकाण ठरत आहेत. या संपूर्ण प्रकरणावरुन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीट करत लिहिले की, “नरेंद्र मोदींनी अद्याप शपथही घेतली नाही आणि NEET परीक्षेतील हेराफेरीने २४ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त केले आहे. एकाच परीक्षा केंद्रातील सहा विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवून अव्वल, किती जणांना असे गुण मिळाले जे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही, परंतु सरकार सातत्याने पेपर फुटण्याची शक्यता नाकारत आहे.”

पुढे त्यांनी म्हंटले की, “शिक्षण माफिया आणि सरकारी यंत्रणा यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या ‘पेपर लीक इंडस्ट्री’ला तोंड देण्यासाठी काँग्रेसने ठोस योजना आखली होती. आमच्या जाहीरनाम्यात कायदा करून विद्यार्थ्यांना पेपर फुटीपासून मुक्त करण्याचा संकल्प होता. मी देशातील सर्वाना आश्वासन देतो की संसदेत मी आपल्या सर्वांचा आवाज बनेन.” असे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.