Modi Cabinet 2024 | मंत्रिमंडळात समावेशासाठी कोणा-कोणाला आले फोन, जाणून घ्या

0

दिल्ली: Modi Cabinet 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज शपथविधी होत आहे. मोदी यांच्यासोबत ३६ खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. मोदी सरकारमध्ये (Modi Govt) टीडीपी (TDP) आणि जेडीयूची (JDU) महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे एनडीएतील मंत्रीपद (NDA Govt) दिले जाणाऱ्या सर्वच नेत्यांना फोन केले जात आहे.

टीडीपीने आपल्या कोट्यातील मंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. टीडीपी नेते जयदेव गल्ला यांनी एक्स वर पोस्ट केले की, त्यांच्या पक्षाला मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळाले आहे.

तीन वेळा खासदार असलेले राम मोहन नायडू हे टीडीपी कोट्यातून नव्याने स्थापन झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असतील आणि पी चंद्रशेखर पेम्मासानी हे राज्यमंत्री असतील.

नितिन गडकरी, राजनाथ सिंह, जीतन राम मांझी, राम नायडू, जयंत चौधरी, चिराग पासवान, जेडीयू नेता रामनाथ ठाकूर आणि अनुप्रिया पटेल यांना फोन आले आहे अशी माहिती मिळाली आहे.

सध्या तरी महाराष्ट्रातून नितीन गडकरी (Nitin Gadkari), पीयूष गोयल (Piyush Goyal), मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), रावेर लोकसभेच्या (Raver Lok Sabha) खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse), रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना फोन आला आहे.

दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी म्हटले आहे. त्यांनाही पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.