Mallikarjun Kharge | विरोधी पक्षाच्या नेत्याला शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण; उपस्थितीबाबत आघाडीतील पक्षांशी चर्चा करून घेणार निर्णय

0

दिल्ली: Mallikarjun Kharge | आज राष्ट्रपती भवनात होणाऱ्या पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल आणि भूतानचे पंतप्रधान डॉ. शेरिंग तोबगे यांनी समारंभाचे निमंत्रण स्वीकारले आहे.

या शपथविधीसाठी विरोधकांना निमंत्रण दिलं नसल्याने एनडीए आणि मोदींवर टीका करण्यात आली होती. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आम्हाला कोणतेही निमंत्रण आले नसल्याचे सांगितले होते. २०२४ च्या निवडणुका नरेंद्र मोदींचा नैतिक पराभव आहे. जयराम रमेश म्हणाले होते,

“स्वयंघोषित विश्वगुरु आता स्वयंघोषित विश्वबंधू झालेत. त्यांनी आपल्या शपथविधीसाठी आंतरराष्ट्रीय नेत्यांना प्राधान्य दिलं आहे. पण अद्याप आम्हाला कुठल्याही स्वरुपाचं निमंत्रण आलेलं नाही. पण मला असं म्हणावसं वाटतंय की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींची खूपच फरफट झाली त्यांचं वैयक्तिक नुकसान झालं आहे. तसंच राजकीय हार आणि मानसिक पिछेहाट झाली आहे. आम्हाला जरी उद्याच्या शपथविधीसाठी निमंत्रण दिलेलं नसलं तरी त्याला उपस्थित राहण्यासारखं काय आहे?” म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे.

त्यानंतर आता या सोहळ्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रण मिळालं आहे. मात्र, काँग्रेस शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही, याबाबत आघाडीतील पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.