Dheeraj Ghate | आज खऱ्या अर्थाने पुण्याने दिवाळी साजरी केली – धीरज घाटे

0

पुणे – Dheeraj Ghate | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत ह्याचा मनस्वी आनंद होत आहे पुणेकरांच्या साठी आज दुग्धशर्करा योग आहे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे सुद्धा मंत्री पदाची शपथ घेत आहेत याचा पुणेकर म्हणून एक नक्कीच अभिमानाचा क्षण आहे आज पुणेकरांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली आहे.मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने पुण्याचे विकासपर्व सुरू झाले आहे पुण्यात विविध योजना केंद्रातून मंजूर करून पुणेकरांचे जीवन मोहोळ सुखदायी करतील हा विश्वास आहे असे प्रतिपादन शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केले.

स प महाविद्यालय चौक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने जल्लोष करण्यात आला यावेळी १०० किलो जिलबीचे वाटप घाटे यांच्या हस्ते पुणेकरांना करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह माजी नगरसेवक अजय खेडेकर ,सम्राट थोरात दिलीप काळोखे ,मनीषा घाटे धनंजय जाधव पुष्कर तुळजापूरकर हेमंत लेले आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.