Yerawada Pune Crime News | पुणे : मैत्रिणीसोबत बोलत असल्याच्या कारणावरुन मित्रावर ब्लेडने वार

0

पुणे : – Yerawada Pune Crime News | मैत्रिणीसोबत बोलत असल्याच्या कारणावरुन मित्रासोबत वाद घालून त्याच्यावर ब्लेडने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना येरवडा परिसरात घडली आहे (Stabbing Case). हा प्रकार गुरुवारी (दि.6) रात्री नऊच्या सुमारास नवी खडकी (Navi Khadki) येथील आनंद मेडीकल समोर घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police Station) तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कार्तिक राम कांबळे (वय-18 रा. भोसले वस्ती, यशवंतनगर, येरवडा) याने शुक्रवारी (दि.7) येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सनी नागेश खरारे (वय-19 रा. तालीम चौक, घोरपडी, पुणे) याच्यावर आयपीसी 324, 352, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोप आणि फिर्य़ादी एकमेकांचे मित्र आहेत.

गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कार्तिक व त्याचा मित्र दिगंबर शिंदे आनंद मेडीकल समोर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी कार्तिकचा मित्र आरोपी सनी खरारे त्याठिकाणी आला. त्याने कार्तिक याला अश्लील शिवीगाळ करुन तू सोनिया सोबत का बोलतो? असे म्हणून कानशिलात लगावली. त्यानंतर सोबत आणलेल्या ब्लेडने कार्तिक याच्या मानेवर वार केले. त्यावेळी कार्तिकचा मित्र दिगंबर भांडण सोडवण्यासाठी गेला असता आरोपी सनी याने त्याच्याही छातीवर ब्लेडने वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

जुन्या वादातून तरुणाला मारहाण

पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरुन तीन जणांनी एका तरुणाला काचेच्या बिअरच्या बाटलीने मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार शुक्रवारी (दि.7) दुपारी पावणे दोनच्या सुमारास सारसबागेतील गणेश मंदिरासमोर घडली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शुभम दिगंबर गजधने (वय-19 रा. दत्तवाडी, पुणे) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रथमेश उर्फ पेढ्या मस्के (रा. सिंहगड रोड), रोहन ओव्हाळ, शाम कारंडे (रा. पर्वती) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शुभम याला मारहाण करत असताना राऊंडला आलेल्या पोलिसांच्या गाडीला पाहून आरोपी पळून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.