Tadipar Criminal Arrest In Pimpri | पिंपरी : गुन्हे शाखेकडून तडीपार गुन्हेगाराला शस्त्रासह अटक

0

पिंपरी : – Tadipar Criminal Arrest In Pimpri | पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असताना विनापरवानगी शहरात फिरणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा (Pimpri Chinchwad Crime Branch) युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून एक कोयता जप्त केला आहे. ही कारवाई चिखली येथील गणेशनगर (Ganesh Nagar Chikhali) येथे करण्यात आली. सुरज भगवान चोपडे (वय-21 रा.रुपीनगर, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना युनिट तीनच्या पोलीस पथकाला माहिती मिळाली की, तडीपार गुन्हेगार सुरज चोपडे हा चिखली परिसरातील गणेशनगर येथील बाळुमामा एंटर प्रायजेस समोर थांबला आहे. पोलिसांनी आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Police Record) असून तो सध्या तडीपार आहे. तडीपार असताना देखील तो चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत होता.

आरोपी सुरज चोपडे याला पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांनी एप्रिल 2024 मध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते. त्याने कोणतीही परवानगी न घेता शहरात फिरत होता. त्याच्याकडून लोखंडी धारदार कोयता जप्त करण्यात आली आहे. चोपडे याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार उद्धव खेडकर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.