Katraj Pune Crime News | पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पकडले, 4 कोयते जप्त

0

पुणे : – Katraj Pune Crime News | दरोडा टाकण्याच्या तयारीत (Robbery Case) असलेल्या चौघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) पकडले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.6) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास आगम मंदिराच्या (Agam mandir Katraj) समोरील अर्धवट बांधकामाच्या बिल्डींगच्या तळमजल्यावर करण्यात आहे. आरोपींकडून चार कोयते व दोरोड्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण दीड हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पवन रविंद्र महादेवकोळी (वय-23 रा. त्रिकोणी बंगल्या जवळ, म्हस्के चाळ, कात्रज), योगेश अनिल शिंदे (वय-19 रा. मुळ रा. मु.पो. डोंजा ता. परांडा जि. धाराशिव), भालचंद्र रविंद्र महादेवकोळी (वय-19 रा. म्हस्के चाळ, कात्रज), मनोज महादेव पांडव (वय-20 रा. संतोष नगर कात्रज) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर पळून गेलेला साथीदार यश घोडके (रा. कात्रज) याच्यावर आपीसी 3999, 402 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार नामदेव निवृत्ती रणुसे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाला माहिती मिळाली की, मंदिराच्या समोरील अर्धवट बांधकामाच्या बिल्डींगच्या तळमजल्यावर अंधारात काही तरुण हातात कोयते घेऊन दरोडा टाकणार आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपींचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. तर चार जणांना पकडले. त्यांच्याकडून चार कोयते, मिरची पावडर असा एकूण एक हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता दरोडा टाकणार असल्याचे आरोपींनी सांगितले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.