Sharad Pawar Vs Ajit Pawar | शरद पवार गटाकडून अजित दादांच्या आमदारांना डेडलाईन, मंत्र्यांच्या मतदारसंघात उमेदवार फायनल

0

पुणे: Sharad Pawar Vs Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीच्या निकालाने (Lok Sabha Election Results 2024) महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्रच पालटून टाकले आहे. राज्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी पक्षात (NCP) फूट पडली. अजित पवारांनी काही नेत्यांना घेऊन महायुतीत सहभागी होत आपली वेगळी चूल मांडली.

दरम्यान आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीत मारलेली बाजी अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. दरम्यान अजित पवार गटाचे काही आमदार संपर्कात असल्याचे वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केले होते.

आता मंत्र्यांच्या मतदारसंघात उमेदवार फायनल झाला असल्याचे सांगत अजित दादांच्या आमदारांना डेडलाईन देण्यात आली असल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे. लोकसभेचे निकाल लागले तेव्हा अजित पवार गटाचे ५ ते ६ आमदार संपर्कात असल्याची शरद पवार गोटातून चर्चा होती.

दरम्यान अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार आमच्या संपर्कात आहेत. या आमदारांना १५ दिवसात निर्णय घ्यावा लागणार, असे रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

शरद पवार यांनी अजित पवार गटातील मंत्र्यांच्या मतदारसंघातील उमेदवार ठरवले आहेत (Vidhan Sabha Election Maharashtra). आज फक्त चर्चा आहे. पुढच्या १५ दिवसात काय होतं ते बघा. दादा आणि पक्षाचे नेते पुढे बसलेले असताना आमदार काय बोलणार , त्यांना १५ दिवसात निर्णय घ्यावा लागले,” असे रोहित पवार म्हणाले.

“शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरु केली असून ३० उमेदवार ठरले आहेत. अजित पवार गटाच्या मतदारसंघात काही उमेदवार फायनल देखील झाले. मात्र १८ ते १९ आमदार आमच्या संपर्कात आहेत. यातील किती घ्यायचे हे शरद पवार आणि जयंत पाटील ठरवतील”, असे रोहित पवार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.