Hinjewadi IT Park Pune | हिंजवडीतून 35 ते 40 कंपन्या बाहेर पडण्याच्या मार्गावर?, सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर घणाघात

0

पुणे: Hinjewadi IT Park Pune | महाराष्ट्रात चुकीच्या धोरणामुळे हिंजवडीतून कंपन्या बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. कंपन्या बाहेर जात असल्याने हिंजवडी ओस पडू लागल्याचेही त्यांनी सांगितले.

” ‘पवारसाहेब’ यांना पुढील आठवड्यात मोठी मिटींग घेण्यासाठी वेळ मागितली आहे. यावेळी राज्य आणि विशेषतः पुण्यातील सगळ्या सॉफ्टवेअर कंपन्यांची आणि मराठा चेंबरची (Maratha Chamber Of Commerce) बैठक लावण्याची गरज आहे. ३५ ते ४० कंपन्या हिंजवडीतून बाहेर चालल्या आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणले. त्यामध्ये ६ लाख जणांना नोकऱ्या मिळाल्या. गेली २५ ते ३० वर्ष त्या कंपन्या उत्तम सुरु होत्या. मात्र, दुर्दैवाने त्या कंपन्या सोडुन चालल्या आहेत. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार मराठा चेंबर आफ कॉमर्स समवेत संबंधितांची बैठक घेणार आहेत.

पुण्यासाठी जम्बो मिटींग लावण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित कंपन्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही खंबीरपणे उभं राहू.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. कंपन्यांना गुंतवणुकीसाठी ‘कॉन्फीडन्स’ देणे आवश्यक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.