Court Crime News | 20000 रुपयांच्या लाच प्रकरणी केजच्या तहसीलदार यांना अटकपूर्व जामीन मंजूर

0

आंबेजोगाई : Court Crime News | तक्रारदार यांचे रास्तभाव धान्य दुकान असुन, त्यांचे रास्त भाव धान्य दुकानामध्ये शासनाकडून मिळालेला धान्यसाठा व तक्रारदार यांनी ग्राहकांना वाटप केलेले धान्य यामध्ये तफावत असल्याचे सांगुन तक्रारदार यांचेवर कारवाई न करण्याकरीता तसेच त्यांचा रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना रद्द न करण्याकरीता आरोपी तहसिलदार अभिजीत जगताप याने आरोपी मच्छिंद्र माने याचे मार्फतीने तक्रारदार यांचेकडे पंच साक्षीदारा समक्ष 40 हजार रुपये लाच मागणी करुन प्रोत्साहन दिले व आरोपी कोतवाल याने तडजोडी अंती 20 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य करुन पंच साक्षीदारा समक्ष तक्रारदार यांचेकडुन 20 हजार रु लाच रक्कम स्वीकारले असता आरोपी मच्छिंद्र माने यास अटक करण्यात आली होती याप्रकरणी आरोपी तहसीलदार अभिजित लक्ष्मण जगताप (Abhijit Laxman Jagtap) यांनी ॲड.प्रताप परदेशी (Adv Pratap Pardeshi) यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी विशेष न्यायाधीश आंबेजोगाई येथे अर्ज केला होता.

ॲड.प्रताप परदेशी यांनी युक्तिवाद केला की, “आरोपी याने तक्रारदारकडे कोणत्याहीप्रकारे पैश्यांची मागणी केली नाही अथवा पैसे स्वीकारलेही नाही आणि या गुन्ह्याशी आरोपीचा कोणताही संबंध नाही.स्वतःवरील कारवाई टाळण्यासाठी खोट्या गुन्ह्यामध्ये आरोपीला तक्रारदार यांनी गोवले आहे.”

सरकारी वकील आणि आरोपीचे वकील ॲड.प्रताप परदेशी यांचा युक्तिवाद ऐकून विशेष न्यायाधीश एस. जे. घरत यांनी आरोपी तहसीलदार यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.