Khed Pune Crime News | अंगावर वीज पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ; खेड तालुक्यातील घटना

0

खेड : Khed Pune Crime News | मागील दोन दिवसांपासून पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. आळंदीलगत चऱ्होली खुर्द (ता. खेड) हद्दीतील वडगाव – आळंदी रस्त्यावरील (Vadgaon Alandi Road) ठाकरवाडी (Thakarwadi) येथे अंगावर वीज पडून आदिवासी कुटूंबातील एका १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ओंकार मारुती ठाकर (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी (दि.५) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाचे वातावरण तयार झाले. मात्र पावसाच्या तुलनेत विजांचा कडकडाट जास्त प्रमाणात होता. दरम्यान कामावरून दुचाकीने घरी येत असताना ओंकारच्या अंगावर वीज कोसळली.

यामध्ये ओंकारच्या शरीराला इजा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. वीज पडून जीवितहानी होण्याची ही दोन दिवसात खेड तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह आळंदी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला

. ओंकारच्या घरची परिस्थिती हलाखीची असून कष्ट करून उदरनिर्वाह केला जात आहे. त्यामुळे शासनाने ओंकारच्या कुटूंबाला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.