Ajit Pawar NCP | आमदारांमध्ये चलबिचल,अजित पवारांची तातडीची बैठक; अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना संपर्क साधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

0

पुणे: लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. दरम्यान आता अजित पवार गटाने पुन्हा एकदा कंबर कसली असून आज मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. पण, अजित पवारांच्या या बैठकीला काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुतीला राज्यात बसलेला जोरदार धक्का पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना (Sharad Pawar) मोठं यश मिळालं. शरद पवारांनी १० पैकी ८ खासदार हे निवडून आणले. तर दुसरीकडे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला.

अजित पवार हे सुनेत्रा पवारांनाही (Sunetra Pawar) निवडून आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये आता चलबिचल सुरू असल्याची माहिती आहे. अजित पवारांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनाही संपर्क साधल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.

हे आमदार पुन्हा शरद पवारांच्या आश्रयाला जाऊन आपली आमदारकी टिकवण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. आता अजित पवारांच्या या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात आणि या बैठकीतील सूर काय निघतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.