Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : 90 गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार गजाआड, सोन्याचे दुकान फोडल्याचा गुन्हा उघड; 25 लाखांचा ऐवज जप्त (Video)

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यासह इतर शहरामध्ये गुन्हे करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला (Criminal On Police Record) निगडी पोलिसांनी (Nigdi Police) अटक केली आहे. अटक केलेल्या गुन्हेगारावर दरोडा, जबरी चोरी, खुन, खुनाचा प्रयत्न असे 90 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून निगडी परिसरातील सोन्याचे दुकान फोडल्याचा गुन्ह्यसह तीन गुन्हे उघडकीस आणून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असा एकूण 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या धोनोरी (Dhanori) येथील सराफ व्यावसायिकाला अटक केली आहे. (Arrest In Robbery)

विकिसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय-35 रा. रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. तर अब्दुला ताहीरबक्ष शेख (वय-58 रा. पोरवाल रोड, धानोरी, लोहगाव) असे सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनाराचे नाव आहे. 24 मे रोजी रात्री निगडी प्राधिकरणातील श्रीलक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून 30 तोळे सोन्याचे दागिने, 10 किलो चांदी आणि 18 हजार रुपये रोख रक्कम, डिव्हीआर चोरुन नेले होते. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने घटनास्थळ व आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तापासून गुन्हेगाराने गुन्हा करण्यासाठी लाल रंगाची श्रेवोलेट एंजॉय गाडी वापरल्याचे निष्पन्न झाले. गाडीचा शोध घेण्यासाठी शहरातील व पुणे शहरातील सरकारी व खासगी असे एकूण 250 ते 300 सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गाडी हडपसर भागात असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीची माहिती घेतली असता तो कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

आरोपी नेहमी शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली. तसेच यापूर्वी त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यामुळे पथकाने सावधगिरी बाळगून आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, आरोपी घरी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून घराला वेढा देऊन जबरदस्तीने घरात घुसून आरोपीला बळाचा वापर करुन ताब्यात घेतले.

आरोपीची पोलीस कोठडीत चौकशी केली असता त्याने तीन साथीदारांसह निगडी येथील ज्वेलर्शचे दुकान फोडल्याची कबुली दिली. तसेच बिबवेवाडी येथे बंद फ्लॅटमध्ये चोरी केल्याचे सांगितले. तर डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चारचाकी वाहन चोरल्याची कबुली दिली. त्याने त्याच्या हिस्स्याचे सोन्याचे दागिने धानोरी येथील सोनाराला विकल्याची माहिती पोलीस पथकाला दिली. त्यानुसार पथकाने सोनार अब्दुल्ला शेख याला अटक करुन त्याच्याकडून 100 ग्रॅम सोन्याची लगड, 8 किलो 300 ग्रॅम वजनाची चांदीची वीट जप्त केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी, घरफोडीचे साहित्य, दोन तलवार असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त राजु मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक गुन्हे तेजस्वीनी कदम, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, अतिंग्रे, पोलीस उपनिरीक्षक रायकर, निगडी तपास पथकातील भगवान नागरगोजे, सुधाकर अवताडे, सिद्राम बाबा, भुपेंद्र चौधरी, राहुल गायकवाड, विनोद होनमाने, दत्तात्रय शिंदे, तुषार गेंगजे, विनायक मराठे, सुनिल पवार, केशव चेपटे, प्रवीण बांबळे, कविता वावरे, स्नेहा म्हस्के, पिंपरी पोलीस ठाण्यातील राजेंद्र बारशिंगे, शांताराम हांडे, विजय जानराव, समीर ढवळे, गणेश काकडे, दिनेश पुंडे, सचिन आचार्य, दत्ता कवठेकर, तांत्रिक विश्लेषक नुतन कोंडे, सीसीटीव्ही कंट्रोल रुमधील स्वप्नाली म्हसकर, सारीका अंकुश यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.