INDIA Aghadi | इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत महत्वाची बैठक, बैठकींनंतर पुढील निर्णय होणार

0

मुंबई: INDIA Aghadi | लोकसभा निवडणुकीच्या निकालावर (Lok Sabha Election Results 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील आणि देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे.

“आज अनेक चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रात १० पैकी ७ जागांवर आघाडीवर आहोत. हे यश फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे, असं मी मानत नाही. काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि आमचे सर्व सहकाऱ्यांनी मेहनत केली त्यामुळे हे यश सगळ्यांना मिळालं. महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेचे खबरदारी घेऊ. मी चंद्राबाबू यांच्याशी बोलले किंवा इतर कुणाशी बोललो यात काही तथ्य नाही. अशा चर्चा आमच्या राष्ट्रीय पातळीवर चर्चा करुन केल्या जातील”, असं शरद पवार म्हणाले.

देशात ‘इंडिया’ आघाडीसाठी आशादायी चित्र दिसत असल्याचा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. विजयाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आपण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सिताराम येचूरी यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती देखील शरद पवार यांनी दिली.

उद्या दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होईल, आणि त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती देखील शरद पवार यांनी दिली. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहाता, देशातील राजकीय समिकरणे बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचे संकेतही शरद पवार यांनी दिले आहे.

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत खूपच उत्सुकता ताणली गेली होती. भारतीय जनता पक्ष अथवा एक्झिट पोलनी केलेल्या भाकित पेक्षा वेगळे निकाल जनतेने दिले आहेत. जनतेच्या मनात या सरकारी विषयी असलेला रोष आणि जाती धर्माच्या नावावर केले गेलेले मुद्दे हे जनतेला आवडले नाहीत. याचाच परिणाम या निवडणुकीत दिसून आला आहे. त्यामुळं या निवडणुकीत खूप चांगल्या पद्धतीनं जनतेनं इंडिया आघाडीला प्रतिसाद दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.