Chandrababu Naidu | सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु; चंद्राबाबू नायडूंच्या दोन अटी भाजपा मान्य करणार?

0

मुंबई: Chandrababu Naidu | लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. त्यानुसार एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडी (India Aghadi) दोन्हींना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. दरम्यान एनडीए आणि इंडिया आघाडीची सत्तास्थापनेच्या संदर्भाने बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.

नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे. एनडीएने आपल्या घटक पक्षांची आज बैठक बोलावली आहे. या बैठकीत सामील होण्यासाठी नितीश कुमार दिल्लीला पोहोचले आहेत.

चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाने या निवडणुकीत एकूण १६ जागा जिंकल्या आहेत. नायडू तीन खासदारांच्यामागे एक मंत्रिपदाची मागणी करीत आहेत. जर हे शक्य झाले तर नव्या सरकारमध्ये त्यांचे पाच केंद्रीय मंत्री होऊ शकतात.

सोबतच चंद्राबाबू नायडूने आपल्या पक्षासाठी लोकसभा अध्यक्षाच्या पदाची मागणी करू शकतात. मात्र याबाबत अधिकृत अशी माहिती आलेली नाही.

केंद्रात सत्ता स्थापनेसाठी २७२ खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. बहुमताच्या आकड्यापासून इंडिया आघाडी दूर आहे. मात्र, तरीही इंडिया आघाडीतील नेते सत्ता स्थापनेचा दावा करत आहेत.

केंद्रातल्या सत्ता स्थापनेत किंग मेकर ठरणारे जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेण्यासाठी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.