Narendra Modi | काठावरच्या बहुमतानं भाजपची धाकधूक, 9 जूनला शपथविधी होणार? राष्ट्रपती भवनात जोरदार तयारी

दिल्ली: Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) सलग तिसरा विजय ऐतिहासिक क्षण असल्याची भावना, काल रात्री कार्यकर्त्यांशी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना व्यक्त केली.
सलग तिसऱ्यांदा जिंकून दिल्याबद्दल त्यांनी देशातील जनतेचे आभार देखील मानले आहेत. देशातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी युती नव्या ताकदीने काम करेल, अशी भावना मोदीनी व्यक्त केली होती. सलग तिसऱ्यांदा मोदी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. अशातच आता एनडीए सरकारच्या शपथविधीबाबत महत्वाची घडामोड समोर आली आहे.
नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याबाबत राष्ट्रपती भवनाने माहिती दिली आहे. राष्ट्रपती भवनाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हंटले आहे की, नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाच्या तयारीमुळे, राष्ट्रपती भवन ५ ते ९ जूनपर्यंत बंद राहणार आहे.
सलग तिसऱ्यांदा मोदी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. अशातच आता एनडीए सरकारचा शपथविधी ९ जून रोजी होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.
१८ व्या लोकसभेचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निकालावर व्यक्त होताना मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट केली असून त्यात मोदी म्हणाले, “देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीए वर विश्वास दाखवला आहे. हा अभूतपूर्व क्षण आहे. जनतेने दाखवलेल्या या प्रेमामुळे मी त्यांचा कृतज्ञ आहे. जनतेच्या आशीर्वादासाठी मी देशवासीयांना आश्वासन देतो की आम्ही नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि समर्पणाने पुढील पाच वर्षात जोमाने काम करू. त्याबद्दल मी जनतेचे मनापासून आभार मानतो व सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो.” असे मोदींनी म्हंटले होते.