Sinhagad Road Pune Crime News | पुणे : तरुणीसोबत असभ्य वर्तन करुन विनयभंग, दोघांवर FIR

0

पुणे : – Sinhagad Road Pune Crime News | रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीला अश्लील स्पर्श (Bad Touch) करुन विनयभंग केला (Molestation Case) . याबाबत आरोपीच्या पत्नीला सांगितले असता तिने तरुणीला शिवीगाळ केली. हा प्रकार डिसेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत सिंहगड रोड येथे घडला आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी (Parvati Police Station) पती-पत्नीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 28 वर्षीय तरुणीने सोमवारी (दि.3) पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शरीफ शेख (रा. सिंहगड रोड, पुणे) व त्याच्या पत्नीवर आयपीसी 354(अ), 354(ड), 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी रस्त्याने पायी जात असताना शरीफ शेख याने अश्लील स्पर्श करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच अश्लील बोलून तिचा पाठलाग करुन त्रास दिला. 7 मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी यांना जाणीवपूर्वक अश्लील स्पर्श करुन विनयभंग केला. त्याने फिर्य़ादीसोबत वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याबाबत तरुणीने आरोपीच्या पत्नीला सांगितले असता आरोपीच्या पत्नीने फिर्य़ादी यांनाच अश्लील शिवीगाळ केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अश्लील बोलून विनयभंग

पुणे : वडील आणि भावावर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करत असल्याच्या कारणावरुन तरुणीचा पाठलाग करुन तिचे फोटो काढले. फोटो व्हायरल करुन बदनामी केली. तसेच अश्लील बोलून (Speaking Obscenely) विनयभंग केला. याप्रकरणी 30 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन श्रीनिवास भगवान दराडे, ज्ञानेश्वर नागोराव वाघमारे, गणेश महादेव शिंदे, मल्लिकार्जुन सुभा, वाडेकर, भगवान श्रीमंत खेडकर, नितीन कारभारी खेडकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.