PMC Action On Unauthorized Construction | महापालिकेकडून एरंडवणा येथे अनधिकृत हॉटेलवर कारवाईचा धडाका

0

पुणे: PMC Action On Unauthorized Construction | कल्याणीनगर अपघातात (Kalyani Nagar Car Accident Pune) दोन तरुणांचा जीव गेल्याने महापालिका प्रशासनाला जाग आली असून अनाधिकृत पब, हॉटेल, रेस्टॉरंटवर कारवाई सुरू केली आहे. एरंडवणातील विविध हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर बांधकाम विभागाच्या झोन ६ ने सोमवारी धडक कारवाई केली.

या कारवाईत सुमारे १४ हजार २०० चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. हॉटेल फूड मंजिल, हॉटेल राम सदन, हॉटेल देहाती, डेमिस्टासे कॅफी, शिव पराठा हाऊस, हॉटेल मिर्च मसाला आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली.

ही कारवाई सहा पोलीस पथके, एक जॉ कटर, एक जेसीबी, दहा अतिक्रमण कर्मचारी यांच्या मदतीने केली. कल्याणीनगर अपघातानंतर पुणे शहरातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनासह महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने अनधिकृत बांधकामप्रकरणी आतापर्यंत ८ हॉटेलवर गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद दिली आहे.

मोहम्मदवाडी बी बी सी रूफ टॅापवर कारवाई करण्यापूर्वी महापालिकेकडून एमआरटीपी १९६६ अन्वये कलम ५३ नुसार नोटीस बजावण्यात आली होती. या कारवाईनंतर एमआरटीपी कलम ५२ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.