PMC Action On Illegal hoardings In Sinhagad Road | सिंहगड रस्ता परिसरातील बेकायदा होर्डिंगवर कारवाई

0

पुणे: PMC Action On Illegal hoardings In Sinhagad Road | मान्सून (Monsoon Updates) पुढील दोन-चार दिवसात महाराष्ट्रात दाखल होत आहे. हवामान विभागाकडून (India Meteorological Department – IMD) वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेकडून होर्डिंग बाबत कारवाया सुरु असल्याचे दिसत आहे. याअगोदरही पुण्यात होर्डिंग पडून जीवित तसेच वित्त हानी झालेली आहे.

पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप खलाटे आणि परवाना निरीक्षक युवराज वाघ परिमंडळ ३ चे महापालिका उपायुक्त संजय सिंह यांच्यासह एकत्रितरित्या सिंहगड रोड परिसरात असलेल्या सर्व होर्डिंगची तपासणी करून इमारतींच्या छतावर असलेल्या सर्व होर्डिंगची तपासणी करून इमारतींच्या छतावर असलेल्या होर्डिंगबाबत संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत.

तसेच धोकादायक स्थितीत आढळलेले चार होर्डिंग काढून टाकण्यात आले आहेत. वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग पडून जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून होर्डिंग धारकांना नोटीस देत ते उतरवण्याच्या नोटिसाही देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.