Jogendra Katyare | खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचा निवडणुकीचा पदभार काढला

0

पुणे : Jogendra Katyare | खेडचे प्रांताधिकारी तथा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी मागेच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) हे राजकीय प्रभावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप करत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्यावरून चांगल्याच चर्चाही रंगल्या होत्या.

मात्र आता जोगेंद्र कट्यारे यांचीच या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे . मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार याबाबतचा आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Chandrakant Pulkundwar) यांनी सोमवारी प्रसृत केला.

जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (७ मे) होत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांची या पदावरून उचलबांगडी करण्याचा आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे.

त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी कट्यारे यांची या पदावरून तडकाफडकी उचलबांगडी केली असून, त्यांच्या जागी सारथी संस्थेचे उपजिल्हाधिकारी अनिल पवार (Anil Pawar) यांची नियुक्ती केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.