Jayant Patil On Chhagan Bhujbal | छगन भजबळ नेमके कोणत्या गटात? जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य, “उद्या संध्याकाळी …”

0

मुंबई : Jayant Patil On Chhagan Bhujbal | शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकाचा समावेश होऊ नये याबाबत आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे आपण पाहिले. त्यांनी महाड येथील चवदार तळ्यावर (Mahad Chavdar Tale) जात मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले. यावेळी त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली. याबाबत त्यांनी जाहीर माफीही मागितली. मात्र विरोधक आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या या कृत्याचा निषेध करत ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत.

याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) नेते छगन भुजबळ यांनी आव्हाड यांची पाठराखण करत आव्हाड चांगल्या भावनेने त्याठिकाणी गेले होते. तेथे चुकून त्यांच्याकडून ती कृती झाली असे म्हणत शालेय अभ्यासक्रमात समावेश करू पाहणाऱ्या शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावरच निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले.

त्यामुळे दोन्ही गटातील नेत्यांमध्ये जिव्हाळा असल्याचे दिसून आले. याबाबत छगन भुजबळ नेमके महायुतीसोबत आहेत की महाविकास आघाडी सोबत ? याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “तुम्ही मला उद्या संध्याकाळी भेटा, तेव्हा तुम्हाला उत्तर देतो. ” त्यावर जयंत पाटलांना विचारण्यात आले की हे उत्तर भुजबळ यांच्याबाबत आहे की इतरांबाबत ? त्यावर पाटील म्हणाले ” केवळ भुजबळांच्याच बाबतीत नाही तर इतरांच्या बाबतीतलाही संभ्रम दूर होईल, भुजबळांचा विषय थोडा वेगळा आहे. ते नेमके कुठल्या बाजूला आहेत ते मी उद्या संध्याकाळी सांगतो, त्याविषयी आत्ता बोलण्यात अंदाज वर्तवण्यात अर्थ नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.