Lok Sabha Exit Poll Results | एक्झिट पोल 2024 : महाविकास आघाडीची सरशी तर सांगलीत अपक्ष निवडून येणार

0

मुंबई: Lok Sabha Exit Poll Results | लोकसभा २०२४ निवडणूकांचे (Lok Sabha Results) निकाल ४ जूनला लागणार आहे. आज शेवटच्या सातव्या फेरीचे मतदान झाले. आता एक्झिट पोलची उत्सुकता लागली आहे. एक्झिट पोल २०२४ च्या अंदाजावरुन देशात कोणाचे सरकार येणार यांचा अंदाज त्यामुळे कळणार आहे.

राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले असून त्यामध्ये महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सरशी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला राज्यात २३ ते २५ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, तर महायुतीला (Mahayuti) २२ ते २६ जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे.

एबीपी माझा-सी वोटरच्या एक्झिट पोल समोर आला असून त्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार टक्कर असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीला मिळणाऱ्या जागांमध्ये शिवसेना (Shivsena UBT) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने २१ जागा लढवल्या होत्या. त्यांना ९ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसने राज्यात १७ जागा लवढल्या होत्या. त्यामधील ८ ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून येतील असे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar NCP) गटाने राज्यातील १० ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ६ जागी त्यांचे खासदार निवडून येतील असा अंदाज एबीपी सी व्होटरमध्ये वर्तवण्यात आला आहे. त्याचसोबत एक अपक्षही निवडून येणार असल्याचे सांगितले आहे. म्हणजे सांगलीमध्ये (Sangli) विशाल पाटील (Vishal Patil) हे बाजी मारतील असा अंदाज सांगतोय.

Leave A Reply

Your email address will not be published.