Lok Sabha Election Exit Poll Results | देशात पुन्हा मोदी सरकार, एक्झिट पोलचा अंदाज; महाराष्ट्रातील समिकरण काय? कोणाची सरशी

0

मुंबई : – Lok Sabha Election Exit Poll Results | लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर आता विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपा (BJP) पूर्ण बहुमतासह पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. परंतु अबकी बार 400 पार हा मोदींचा नारा सत्यात उतरताना दिसत नाही. भाजपा आणि एनडीएला (NDA) मिळून 350 च्या वर जागा मिळतील असा अंदाज आहे.

टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार देशातील 543 जागापैकी 353 ते 368 जागा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या (India Aghadi) खात्यात 118 ते 133 जागा जाण्याची शक्यता आहेत. तर इतर पक्ष 43 ते 48 जागी जिंकण्याची शक्यता आहे.

या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रासाठी मात्र धक्कादायक अंदाज वर्तवला आहे. देशात भाजप मुसंडी मारणार असला तरी महाराष्ट्रात भाजपा आणि एनडीए ला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इतरांच्या खात्यात एक जागा जाऊ शकते.

रिपब्लिक -PMARQ च्या एक्झिट पोलनुसार देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 359 आणि इंडिया आघाडीला 154 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महायुतीला 27 ते 32 आणि महाविकास आघाडीला 15 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना एक जागा मिळू शकते.

महाराष्ट्रात कट टू कट फाईट

एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला -9, शरद पवार (Sharad Pawar NCP) गटाला -6 आणि काँग्रेसला 8 अशा महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) एकूण 23 जागांवर विजय मिळू शकतो. तर महायुती (Mahayuti) 24 जागा जिंकू शकते. त्यात भाजपचं कमळ -17 जागांवर फुलेल. तर शिंदे गट -6 आणि अजित पवार गटाला एका जागेवर समाधान मानावं लागेल.

तसेच सांगलीमध्ये (Sangli) विशाल पाटील (Vishal Patil) यांना यश मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नागपुरात नितीन गडकरी (Nitin Gadkari) आघाडीवर आहेत तर विकास ठाकरे (Vikas Thackeray) पिछाडीवर आहेत. साताऱ्यात शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आघाडीवर असण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर सोलापुरात प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

TV9 पोल स्टाट- पीपल्स इनसाईटच्या अंदाजानुसार चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) आघाडीवर आहेत तर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) पिछाडीवर आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू महाराज आघाडीवर आहेत तर संजय महाडीक पिछाडीवर आहेत. बीड लोकसभा मतदार संघातून पंकजा मुंडे आघाडीवर आहेत तर बजरंग सोनावणे पिछाडीवर आहेत. नगर लोकसभा मतदार संघातून निलेश लंके (Nilesh Lanke) आघाडीवर आहेत तर सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) पिछाडीवर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.