Kalyaninagar Porsche Car Accident Pune | ‘त्या’ला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा; बाल न्याय मंडळाचा आदेश

0

पुणे: Kalyaninagar Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर भागात महागडी पोर्शे कार चालवत मद्यपान करून घडललेया अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला. यातील संबंधित आरोपी मुलाची व्यसनाधीनता थांबावी म्हणून त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्याचा सल्ला बाल न्याय मंडळाने Juvenile Justice Board (JJB) दिला आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी मुलाला गुन्हा घडल्यानंतर बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी गुन्हा जामीनपात्र असून तो अल्पवयीन असल्याचे त्याच्या वकिलाने मंडळाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावेळी मंडळाने मुलाला जामीन मंजूर केला होता.

त्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटल्यानंतर पोलिसांनी (Pune Police) कलमात वाढ करत पुन्हा संबंधित मुलाला मंडळा समोर हजर केले. त्यानंतर मुलाला बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश मंडळाकडून देण्यात आले. हा आदेश देताना मंडळाने त्यात मुलाचा ताबा कोणाकडे असेल, त्याला पालकांना भेटण्याची परवानगी, त्याची मुक्तांगणमध्ये रवानगी यासह विविध मुद्यांवर आदेश दिला आहे.

दरम्यान, पाच जूनला मुलाची मंडळातून सुटका झाल्यानंतर त्याचा ताबा कोणाकडे द्यायचा आहे त्यांची नावे द्यावीत, अशी सूचना मंडळाने मुलाच्या कुटुंबीयांच्या वकिलांना केली आहे.

मुलाचा त्याचा रक्ताच्या नात्यातील सदस्यांकडे ताबा देता येणार नाही. त्यामुळे त्रयस्थ व्यक्तीची नावे द्यावीत, असे मंडळाने सूचित केले आहे. मात्र अद्याप ही नावे मंडळात सादर करण्यात आलेली नाहीत. मुलाचे कुटुंबीय आठवड्यातून दोनदा सकाळी १० ते १२ दरम्यान भेटू शकतात असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मुलाला नेमके कधी आणि किती दिवस मुक्तांगण मध्ये पाठवायचे आहे. त्याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. कोणतेही अल्पवयीन बालक जेव्हा दाखल होते तेव्हा त्याच्या सुधारणेसाठी काय काय करण्यात आले याचा अहवाल पर्यवेक्षक सादर करत असतात त्यामुळे मुलाच्या सुधारणेसाठी नेमके काय करण्यात आले याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच याची माहिती मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.