Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : धनिकपुत्राची आणखी एक पळवाट बंद, पोर्शे कारमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता; कंपनीच्या अहवालातून झाले स्पष्ट

0

पुणे : – Kalyani Nagar Car Accident Pune | पोर्शे अपघात प्रकरणात (Porsche Car Accident Pune) पुरावे गोळा करण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) कंबर कसली आहे. कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अपघात झालेल्या पोर्शे कारमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. पोर्शे कंपनीने केलेल्या अधिकृत तपासणीच्या अहवालातून ही माहिती स्पष्ट झाली आहे. कंपनीकडून यासंदर्भातील अधिकृत अहवाल पुणे पोलिसांना सादर केला आहे. धनिकपुत्राने ठोकलेल्या पोर्शे गाडीची तपासणीसाठी पोर्शे कंपनीची टीम पुण्यात आली होती. कंपनीच्या प्रतिनिधींनी गाडीची तपासणी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

कल्याणी नगर परिसरात बिल्डर अग्रवालच्या (Builder Vishal Agarwal) अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात पोर्शे कार चालवून दोघांना उडवलं होतं. या प्रकरणात अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी अग्रवाल कुटुंबाकडून प्रयत्न केले जात आहेत. अपघात प्रकरणात अग्रवाल याच्या वकिलांनी गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी थेट पोर्शे कार कंपनीच्या अधिकृत पथकाला पुण्यात बोलावून घेऊन अपघातग्रस्त गाडीची तपासणी केली. पोर्शे कार कंपनीच्या मुंबई सेंट्रलहून प्रतिनिधी पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी गाडीची तपासणी करुन गाडीत कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचा अहवाल दिला. त्यामुळे मुलाला वाचवण्यासाठी वकिलांनी काढलेली पळवाट आता बंद झाली आहे.

गाडीतील सीसीटीव्ही तपासले

पोर्शे गाडीमध्ये लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा देखील तपासण्यात आला. काही दिवसांपूर्वी कंपनीच्या प्रतिनिधींनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) जाऊन गाडीची तपासणी केली होती. गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार अल्पवयीन तरुणाच्या कुटुंबीयांनी केली होती. ही गाडी ऑटोमॅटीक आहे. तपासणीनंतर आम्ही याबाबत माहिती देऊ शकू, असे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले होते.

गुन्ह्यात 10 जणांना अटक

पुण्यातील कल्याणी नगरमध्ये रविवारी (दि.19 मे) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात आयटी अभियंता असलेले अनिश अवधिया (वय-27) आणि अश्विनी कोष्टा यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताच्या वेळी आरोपी अल्पवयीन मुलागा त्याच्या ताब्यातील पोर्शे कार ताशी 160 किमीच्या वेगात चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर आयपीसी 279, 304(a), 337, 338, 427 आणि मोटार वाहन कायदा कलम 184 आणि 119/177 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

विशाल अग्रवाल (वय 50), सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendra Kumar Agarwal), शिवानी अग्रवाल (Shivani Vishal Agarwal), कोसी पबचे (Cosie Pune) मालक नमन प्रल्हाद भुतडा Naman Prahlad Bhutada (वय 25), मॅनेजर सचिन अशोक काटकर (वय 35), ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगले (वय 35), कर्मचारी नितेश धनेश शेवानी (वय 34) आणि मॅनेजर जयेश सतीश गावकर (वय 23), ससून हॉस्पिटलचे डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware), डॉ श्रीहरी हळनोर (Dr Sharihari Halnor), वॉर्डबॉय अतुल घटकांबळे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.