Action On Rooftop-Resto Bar-Pubs In Pune | 63 रूफटॉप, रेस्टो बार, पबचे परवाने निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कारवाई

0

पुणे: Action On Rooftop-Resto Bar-Pubs In Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून (Kalyani Nagar Car Accident Pune) आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत पोलीस पैसे खाऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर त्यांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागात (Excise Department Pune) जात अनधिकृत पब, बार ची यादीच वाचून दाखवली होती. तसेच महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) कारवाईबाबतही निशाणा साधला होता.

त्यानंतर महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस यांनी कारवाईचा धडाका लावल्याचेही चित्र पाहायला मिळाले. कल्याणीनगरमध्ये झालेल्या दुर्दैवी कार अपघातानंतर प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. दारूची दुकाने, बार, पबमध्ये नियमांचे पालन करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले होते.

मात्र नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आल्याने विभागाने आक्रमक होत धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत नियमांचे पालन न करणाऱ्या रूफटॉप, रेस्टो बार आणि पबवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानंतर कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांना सादर करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, “गेल्या आर्थिक वर्षात राज्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १९ पबवर कारवाई प्रस्तावित केली होती. उत्पादन शुल्क विभागाला त्याबाबतचे आदेश आले होते.

तसेच चालू आर्थिक वर्षात ६३ पब मध्ये नियमांचे उल्लंघन केले गेले आहे. त्यानुसार आतापर्यंत ८२ रूफटॉप, रेस्टो बार आणि पबवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघातानंतर जाग आलेल्या पालिका, पोलीस,राज्य उत्पादन शुल्क आदी यंत्रणांनी नियमांचे उल्लंघन करणे, अल्पवयीन मुलांना दारू देणे, वेळेचे पालन न करणे आदी कारणांमुळे आतापर्यंत ६३ रूफटॉप, रेस्टो बार आणि पबचा परवाना तात्पुरता निलंबित केला आहे. ही कारवाई पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.