Vishal Surendra Kumar Agarwal In Yerawada Jail | अगरवाल बाप लेकाचा मुक्काम आता येरवडा कारागृहात

0

पुणे: Vishal Surendra Kumar Agarwal In Yerawada Jail | कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Kalyani Nagar Car Accident Pune) आरोपी अल्पवयीन मुलाचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी चालकाचे अपहरण करून त्याला बंगल्यात डांबून ठेवल्याप्रकरणी आरोपी सुरेंद्रकुमार अगरवाल (Surendra Kumar Agarwal) आणि विशाल अगरवाल (Vishal Agarwal) यांना न्यायालयाने (Pune Shivaji Nagar Court) चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे या बापलेकाचा मुक्काम आता येरवडा कारागृहात (Yerawada Jail) असणार आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए. पांडे (Judge AA Pandey) यांनी हा आदेश दिला.

‘पोर्शे’ कार भरधाव चालवून (Porsche Car Accident Pune) तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाचे अपहरण करून त्याचा मोबाइल फोन काढून धमकावल्याप्रकरणी सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्ता अगरवाल (वय ७७) आणि विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय ५०, दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३४२ (चुकीच्या पद्धतीने कैदेत ठेवणे), कलम ३६५ (अपहरण), कलम ३६८ (बेकायदा लपवून ठेवणे किंवा डांबून ठेवणे), कलम ५०६ (धमकावणे) आदी कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.

न्यायालयीन कोठडी झाल्याने आरोपी सुरेंद्रकुमार अगरवाल व विशाल अगरवाल यांना जामीनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात विशाल अगरवाल याने जामीनासाठी अर्ज केला असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.