Supriya Sule On Milk Price | ‘सात दिवसात दुधाचे दर वाढवा अन्यथा…’; दूध उत्पादकांसाठी सुप्रिया सुळेंचा इशारा

0

पुणे: Supriya Sule On Milk Price | शेतमालाला भाव नसल्याने अगोदरच अडचणीत असलेले शेतकरी आता दूधाच्या दरात घट झाल्यामुळे आणखी अडचणीत आले आहेत . गेल्या काही दिवसांपासून शेतमालाला भाव नसल्यामुळे हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना दूधापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आधार होता. पण हे दर देखील कमी झाल्याचे शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही. अशी परिस्थिती सध्या राज्यातील शेतकऱ्यावर निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात २६७ शेतकऱ्यांनी निवडणुकीच्या पाच टप्प्याच्या कालावधीत आपले जीवन संपवले आहे.

मात्र आता शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुधाच्या दराच्या संदर्भात पशुसंवर्धन विभाग आणि खरेदीदार संघांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून गाईच्या दुधाला पंचवीस रुपये प्रति लिटरला दर होता. मात्र, दीड महिन्यापूर्वी तो २७ रुपये करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. म्हणजे दुधाचे दर जवळपास २९ रुपयांवर पोहोचले होते. अशातच आता पुन्हा २५ मेपासून दोन रुपयांनी दर कमी केले आहेत. त्यामुळे सध्या २९ रुपयांपर्यंत पोहोचलेल्या दुधाचे दर आता पुन्हा २७ रुपयांपर्यंत खाली आले आहे.

येत्या ७ दिवसात दुधाचे दर वाढवा अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा सुळेंनी दिला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” एका बाजूला दुधाचे दर कमी होत असताना दुसऱ्या बाजुला पशुखाद्य, चारा यांचे दर अतिशय वाढलेले दिसत आहेत. दुधाच्या कमी झालेल्या दरांमुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहेत. हे लक्षात घेता माझी शासनाला विनंती आहे की, दूधाचे दर पुर्ववत करण्याच्या दृष्टीने सात दिवसांच्या आत शासनाने पावले उचलावीत. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

एका बाजुला उन्हामुळे दुधाच्या उत्पादनातही घट झाली. पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्‍न, पशुखाद्याचे वाढते दर यामुळे दूध उत्पादक मेटाकुटीला आला आहे. काही दिवसांपूर्वी दोन रुपये वाढवलेले गाईच्या दुधाचे दर बहुतांश दूध संघांनी पुन्हा दोन रुपयांनी कमी केले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वाढता उत्पादन खर्च पाहता मिळणारा दर योग्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.