Suhas Diwase On Jogendra Katyare | प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्या आरोपांवर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे जशास तसे उत्तर

0

पुणे: Suhas Diwase On Jogendra Katyare | पुण्याचे जिल्हाधिकारी (Pune Collector) सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. खेड आळंदीचे प्रांताधिकारी (Khed Alandi Prantadhikari) आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदार (Khed Alandi MLA Dilip Mohite Patil) यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे.

यामध्ये “सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रिडा आयुक्त, PMRDA चे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. तसेच सुहास दिवसे हे जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देत आहेत.

आमदार त्यांचे हितसंबध जोपसण्यासाठी दिवसे यांचा वापर करत आहेत. सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमिन अधिग्रहण प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केलेली असताना २८ मे रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा घातला.‌ सुहास दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

कट्यारे यांनी केलेल्या आरोपावर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “माझ्यावर आरोप असलेले पत्र मी आज पाहिले, मी एकाचवेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून दोन पातळ्यांवर काम करत असतो.

माझ्यावर आरोप करणाऱ्या कट्यारे यांनी यात गल्लत केली आहे. कट्यारे यांची बदली करण्याचा अधिकार शासनाला आहे. मी जिल्हाधिकारी पदावर येण्याआधी कट्यारे यांच्याविरोधात तक्रारी आल्या होत्या आणि त्यांची चौकशी करण्यात येते आहे. कट्यारे यांच्याकडून जमीन अधिग्रहणाची भरपाई देण्याची जबाबदारी काढून घेण्यात आल्याने ते व्यथित झाले असावेत, असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी म्हटले आहे.

प्रांताधिकारी कट्यारे यांनी भरपाई देण्याच्या निकालात अनेक बदल केलेले आहेत. कट्यारे यांनी आरोप करून नियमभंग केलेला आहे, कट्यारे यांनी जर चुकीचे काही केलेले नसेल तर त्यांनी तपासणीला घाबरण्याचे कारण नाही. राजकीय संबंध असल्याच्या आरोपांना उत्तर देण्यात अर्थ नाही, मी पुणे जिल्ह्यातील २१ आमदारांसोबत आणि चार खासदारांसोबत काम करतो, असे प्रत्युत्तर दिवसे यांनी दिले.

अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंनी प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले ते म्हणाले की, “पुण्यातील खेड-राजगुरूनगरचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंनी कायतरी पाप केलंय, म्हणूनच मी आत्महत्या करेन, अशी धमकी त्यांना द्यावी लागत आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी. येत्या अधिवेशनात मी प्रांताधिकारी कट्यारे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याबाबतचा हा प्रश्न उपस्थित करणार आहे” असे मोहितेंनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.