Shivani Agrawal Arrest | पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या आई शिवानी अग्रवालला अटक, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती (Video)

0

पुणे : – Shivani Agrawal Arrest | कल्याणीनगर (Kalyani Nagar Car Accident Pune) येथील पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident Pune) प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) अल्पवयीन कार चालकाची आई शिवानी अग्रवाल यांना अटक केली आहे. यापूर्वी पुणे पोलिसांनी अल्पवयीन कारचालकाचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Kumar Agrawal) यांना अटक केली आहे. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास पुणे पोलिसांनी शिवानी अग्रवाल यांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी दिली आहे.

अल्पवयीन मुलाने पोर्शे कार बेदरकारपणे चालवून दोन निष्पापांचा बळी घेतला. यानंतर या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, त्याला 15 तासात जामीन मिळाला. यावरुन समाजमाध्यमांमध्ये आणि समाजातही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त झाला. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या वडिलांना आणि आजोबांना अटक केली होती. त्यापाठोपाठ या मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे.

कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी (Blood Sample Tampering Case) अन्य दुसऱ्या कुणाचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणात ते रक्त अल्पवयीन मुलाच्या आईचेच असल्याचा संशय पोलिसांना होता. याशिवाय ससून रुग्णालयात या अल्पवयीन कारचालकाला आणल्यानंतर मोठी हेराफेरी झाली होती. अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पल ऐवजी दुसऱ्याचेच सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सध्या पुणे पोलीस करीत आहेत.

दरम्यान, सध्या बालसुधारगृहात असलेल्या या अल्पवयीन कार चालकाकडे पुणे पोलीस चौकशी करणार आहेत. याबाबत पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे (Juvenile Justice Board (JJB) परवानगी मागितली होती. बाल न्याय मंडळाने परवानगी दिल्यानंतर पोलीस आज दोन तास अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहेत.या चौकशीवेळी त्याची आई शिवानी अग्रवाल यांना देखील पोलीस त्या ठिकाणी घेऊन जाण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.