Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : दारुच्या क्वाटरचे पैसे न दिल्याने दोन भावांना मारहाण, 5 जणांना अटक

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | दारूच्या क्वाटरचे पैसे न दिल्याच्या रागातून पाच जणांच्या टोळक्याने दोन भावांना बेदम मारहाण केली (Attack On Youth). हा प्रकार 24 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी देहूगाव (Vitthalwadi Dehugaon) येथील गणपती मंदिराजवळ घडला. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी (Dehu Raod Police Station) पाच जणांना अटक केली आहे.

याबाबत मनीषा लक्ष्णम केंदळे (वय-40, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांनी शुक्रवारी (दि. 31) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन दीपक पांडुरंग चव्हाण (वय 38), विक्रम उर्फ विकी पांडुरंग चव्हाण (वय 34), किरण पांडुरंग चव्हाण (वय 37), निखील पांडुरंग चव्हाण (वय- 32, चौघे रा. विठ्ठलवाडी, देहूगाव), उमेश उत्तम मांढरे (वय-32, रा. देहूगाव) यांच्यावर आयपीसी 325, 323, 504, 143, 147, 149 अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीषा यांचा मोठा मुलगा संतोष केंदळे आणि लहान मुलगा सुमीत केंदळे हे घरी होते. त्यावेळी आरोपी त्यांच्या घरी आले. संतोष याने पूर्वीच्या दारुच्या क्वाटरचे पैसे न दिल्याचा राग मनात धरुन आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला. तसेच संतोष याला मारहाण करुन गंभीर जखमी केले. सुमीत केंदळे याने आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सुमित याला देखील मारहाण केली. तसेच शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.