Porsche Sports Cars In Pune | पुण्याच्या रस्त्यावर धावताता तब्बल 25 पोर्शे स्पोर्ट्स कार

0

पुणे : – Porsche Sports Cars In Pune | पुण्यातील कल्याणीनगर (Kalyani Nagar Car Accident Pune) भागात आलिशान पोर्शे कारने दोघांना उडवल्यानंतर पोर्शे कार चर्चेत आली आहे (Pune Porsche Car Accident). या कारची किंमत कोटीच्या घरात आहे. पुणे शहरामध्ये मागील साडेतीन वर्षात आरटीओ कार्य़ालयात 25 पोर्शेकारची नोंद झाली आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिक, उद्योजक तर काही कंपन्यांच्या मालकीच्या या आलिशान कार असल्याचे समोर आले आहे. पुणे शहरामध्ये पोर्शे कार शिवाय जॅग्वार, फेरारी आणि लॅम्बोर्गिनी या सारख्या महागड्या कार खरेदी करण्याकडे पुणेकरांचा कल असल्याचे पाहायला मिळते. (Pune RTO Office)

कल्याणी नगर अपघातानंतर पुणे शहरात पोर्शे कार किती आहेत याची माहिती पुणे आरटीओ कार्य़ालयाकडून घेतली. मागील साडेतीन वर्षात 25 पोर्शे स्पोर्ट्स कारची खरेदी झाल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय पुणेकरांनी पोर्शे कार प्रमाणे जॅग्वार, फेरारी व लॅम्बोर्गिनी या स्पोर्ट्स कारबरोबर ‘बीएमडब्ल्यू’ची खरेदी केल्याचे दिसून येते. मात्र, या महागड्या स्पोर्ट्स कार उद्योगपती, बांधकाम व्यावसायिक यांच्या लाडक्या बाळांकडे असतात.

गाडी मालकांची नावे गोपनीय

पुणे प्रादेशिक परिवहन कार्य़ालयात 2021 मध्ये तीन पोर्शे स्पोर्ट्स कारची नोंद आहे. 2022 मध्ये 10 तर 2023 मध्ये 7 आणि चालू वर्षात 2024 मध्ये एप्रिल महिन्यात चार पोर्शे कार खरेदी केल्याची नोंद आहे. या कार कोणी खऱेदी केली त्यांची नावे देण्यास आरटीओ कार्यालयाने नकार दिला आहे. एम वाहन या मोबाईल अॅपवर त्या कार मालकांची नावे शोधा असे आरटीओ कार्य़ालयाने स्पष्ट सांगितले. मात्र, एम वाहन या मोबाईल अॅपवर या कार मालकांची नोंद नाही. इतर दुचाकी व कार मालकाची माहिती लगेच मिळते, पण महागड्या गाड्यांची माहिती या अॅपवर मिळत नाही

Leave A Reply

Your email address will not be published.