Manoj Jarange Patil Marathi Movie | मनोज जरांगे पाटील विरुद्ध मनोज जरांगे पाटील; रुपेरी पडद्यावर रंगणार सामना

0

मुंबई: Manoj Jarange Patil Marathi Movie | मनोज जरांगे पाटील मागील अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation Andolan) लढा देत आहेत. लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला होता. या आरक्षणाच्या लढ्याने मराठा समाज मोठ्या संख्यने रस्त्यावर उतरल्याचे चित्रही पाहायला मिळाले.

आता मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. ‘संघर्षयोद्धा…मनोज जरांगे पाटील’ आणि ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ हे दोन्ही चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहेत. ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ या चित्रपटाचा टीझर गुरुवारी ( ३० मे रोजी ) लाँच करण्यात आला.या टीझरनुसार हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे हे या चित्रपटात मनोज जरांगे यांची भूमिका साकारली आहे.

तर, ‘संघर्षयोद्धा…मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट आधीच रिलीज होणार होता. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर २१ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ‘आम्ही जरांगे- गरजवंत मराठ्यांचा लढा’ या चित्रपटाच्या टीझर लाँच नंतर आता या संघर्षयोद्धा चित्रपटाने आपली चित्रपट प्रदर्शनाची तारीख एक आठवडा आधीच जाहीर केली आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार असल्याने कोणत्या चित्रपटाला अधिक प्रतिसाद मिळणार, याकडेही सिनेरसिकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्या चित्रपटात कोणते कलाकार?

‘संघर्षयोद्धा… मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेते मोहन जोशी, संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे, श्रीकृष्ण शिंगणे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. नारायण प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ या चित्रपटांमध्ये मकरंद देशपांडे, सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरकर, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे आदी कलाकारांची मांदियाळी दिसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.