Chakan Pune Crime News | पिंपरी : ग्रामसेवकाच्या नावाने चिठ्ठी लिहून एकाची गळफास घेऊन आत्महत्या

0

पिंपरी : – Chakan Pune Crime News | निघोजे (Nighoj) ग्रामपंचायतचे केलेल्या कामाचे पैसे दिले नाहीत तसेच कुटुंबाला बरबाद करण्याची धमकी देणाऱ्या ग्रामसेवकाच्या नावाने चिठ्ठी (Suicide Note) लिहून एका व्यक्तीने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केली. हा प्रकार 27 मे रोजी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दौंडकरवाडी (Daundkar Wadi Chakan) येथे घडला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan Police Station) आठ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

रमेश मच्छिंद्र मोहिते (वय 45) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आकाश रमेश मोहिते (वय 24, रा. दौंडकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ग्रामसेवक विष्णू लक्ष्मण गाडीलकर (रा. शिरूर), भास्कर जाधव, विलास भास्कर जाधव, संजय भीमराव जाधव, रुपेश दौंडकर, एक अनोळखी व्यक्ती आणि दोन महिलांच्या विरोधात आयपीसी 306, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथे रमेश मोहिते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे कपडे धुत असताना त्यांच्या पॅन्टच्या तीन चिठ्ठ्या सापडल्या. त्यातील एका चिठ्ठीत, ‘निघोजे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विष्णू गाडीलकर यांनी रमेश यांनी केलेल्या कामाचे दीड लाख रुपये दिले नाहीत. ते मागितले असता देणार नाही असे म्हणत तुमचे कुटुंब बरबाद करीन. तसेच रमेश यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहीले आहे.

दुसऱ्या चिठ्ठीत फिर्यादी यांचा भाऊ विकास यांच्या सासरकडील लोकांनी भाऊ विकास आणि वडील रमेश यांना जीवे मारून केस करण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही कारणांवरून आपण आत्महत्या करत असल्याचे रमेश यांच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. चाकण पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.