Alcohol Selling Rules In Daund-Baramati-Indapur | मद्यविक्रीबाबत पुणे शहरात काटेकोर अंलबजावणी मात्र दौंड, बारामती, इंदापूर भागात कानाडोळा

0

पुणे: Alcohol Selling Rules In Daund-Baramati-Indapur | कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून (Kalyani Nagar Car Accident pune) मद्यविक्रीबाबतच्या नियमांचे तंतोतंत पालन पुणे शहरात होताना दिसत आहे. मात्र ग्रामीण भागातील पुणे, दौंड, इंदापूर भागात वयाचे बंधन झुगारून मद्यविक्री करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

राज्यात मद्य तसेच तत्सम पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कामकाज राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत (Excise Department Pune) केले जाते. पुणे ग्रामीण भागातील या विभागातील अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या परमिट रूम, बिअर शॉपी, वाइन शॉप, देशी दारू दुकानांच्या संख्येबाबत अनभिज्ञ असल्याने त्यांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बारामतीत परमिट रूम, बिअर शॉपी, वाइन शॉप, देशी दारू दुकानात वयाचे बंधन झुगारून मद्यविक्री करण्यात येत आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक दर्जाचे अधिकारी ‘दुकाने माहीत नाहीत,’ असे सांगत आहेत.

‘पुण्यातील घटनेला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यासह निरीक्षक दर्जाचे अधिकारी कारणीभूत आहेत. म्हणून नियमभंग होत आहेत,’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

परमिट रूम, बिअर शॉपी, वाइन शॉप, देशी दारू या दुकानांच्या संख्येबाबत सध्या माहिती नाही. याबाबत अधिक माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल. असे विजय रोकडे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.