Action On Pubs & Bars In Pune | पुण्यातील अनधिकृत पब, बार वरील कारवाईचा हातोडा अचानक थंडावला: कारवाईची संख्या 40 वरून फक्त 2 वर

0

पुणे: Action On Pubs & Bars In Pune | पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार भीषण अपघात प्रकरणानंतर प्रशासनाने धडक कारवाईला सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळाले (Kalyani Nagar Car Accident Pune). या अपघातात बिल्डर विशाल अगरवाल (Vishal Agarwal Builder) च्या मुलाने मद्यपान करून दोन अभियंता तरुणांना पोर्शे कारने उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणानंतर पुणे शहरात पोलीस (Pune Police), महापालिका Pune Municipal Corporation (PMC), राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department Pune) माध्यमातून अनधिकृत पब, बार वर कारवाई करण्यात आली. अपघात झाल्यानंतर ज्या वेगाने कारवाई करण्यास सुरूवात करण्यात आली होती तो कारवाईचा वेग मात्र गेल्या दोन दिवसांपासून कमालीचा थंडावला आहे.

अपघात घडल्यानंतर २२ मे रोजी पुण्यात तब्बल ४० ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. मात्र आता तोच आकडा २९ मे पर्यंत फक्त दोनपर्यंत येऊन पोहोचला आहे. कारवाई सुरू केल्यापासून २२ मे ते २९ मे या कालावधीमध्ये ७७ प्रकरणांमध्ये कारवाई झाली.

मात्र, हा कारवाईचा धडाका पहिल्या दिवसाच्या तुलनेत सातव्या दिवसांपर्यंत पूर्णतः खाली आला. त्यामुळे यांना कोणाचा वरदहस्त आहे आणि कारवाई अचानक का थंडावली अशी चर्चा पुणेकर नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

पुण्याच्या या अपघात प्रकरणानंतर पुण्यातील पोलीस, ससून रुग्णालय (Sassoon Hospital), राज्य उत्पादन शुल्क विभाग, आरटीओ, महापालिका , पोलीस स्टेशनला मध्यरात्रीच पोहोचलेले आमदार , त्याचबरोबर जामीन देणारे बाल हक्क मंडळ Juvenile Justice Board (JJB) या सर्वच यंत्रणा किती खोलवर पोखरल्या गेल्या आहेत याचाही पुरावा या प्रकरणानंतर समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.