Rules In Pubs & Bars In Maharashtra | राज्यात पब आणि बारमध्ये कठोर नियम लागू होणार; नियमांचा भंग केल्यास कारवाई

0

पुणे: Rules In Pubs & Bars In Maharashtra | कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून (Kalyani Nagar Car Accident Pune) मोठे वादंग निर्माण झाले आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात तरुणाई आहे. ही तरुणाई मोठ्या प्रमाणात हॉटेल, बार आणि पबमध्ये (Pubs In Pune) जाऊन धांगड-धिंगाणा घालत असते. दरम्यान, हे बार आणि पब पहाटे पाच पर्यंत सुरू ठेवत होते. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नव्हते. शिवाय पोलिसांना चिरीमिरी देऊन देखील रात्री उशिरा पर्यंत हे हॉटेल सुरू ठेवले जात होते.

मात्र कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणानंतर पोलिसांनी नियमांचा भंग करणाऱ्या पब, बार वर कारवाईचा धडाका सुरु केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी या प्रकारानंतर विभागातील अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत कारवाईचे निर्देश दिलेले आहेत. तसेच या बैठकीत पब, बार बाबत नव्याने नियमावली करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. नियमांचा भंग केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

मंत्री शंभूराज देसाईंनी घेतलेल्या विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये पुण्यातील प्रकार रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

काय असतील नियम –

१) परवाना कक्षा मध्ये २१/२५ वयाखालील व्यक्तींना बियर/मद्य विक्री केल्यास आस्थापनांवर कडक कारवाई केली जाणार

२) हॉटेल च्या ओपन टेरेसवर मद्य पुरवल्यास कारवाई केली जाणार

३) उत्पादन शुल्क विभागाने नियमाने दिलेल्या वेळेनंतर अनुद्यप्ति सुरू असल्यास कारवाई केली जाणार

४) शहरी भागात दीड वाजेपर्यंत तर ग्रामीण भागात ११ वाजेपर्यंतच आस्थापन सुरू ठेवण्याच्या सूचना

४) महिला वेटरेस विहित वेळेनंतर कार्यरत असल्यास कारवाई संबधित आस्थापनावर कडक कारवाईच्या सूचना

५) विनापरवाना मद्यसाठा मिळुन आल्यास कायदेशीर कारवाई करावी व संबधित मद्यसाठ्याचे सखोल निरीक्षण करावे

६) तसेच कार्यक्षेत्रातील सर्व ब्लॅक लिस्टेड परमिट रूम व बियर शॉप यांनी एफएल-1 ट्रेड मधुन Cash andh Carry scheme पध्दतीने मद्यसाठा ख़रेदी करणे बंधनकारक राहणार आहे.

७) या शिवाय विभागातील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांची त्या त्या विभागीय कार्यालयात नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.