Pune SPPU Crime News | पुणे : विद्यापीठात गांजा सापडल्याने अभाविप आक्रमक, पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट (Video)

0

पुणे :- Pune SPPU Crime News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये Savitribai Phule Pune University (SPPU) काही दिवसांपूर्वी विद्यार्थी वसतीगृहामध्ये गांजा (Ganja) सापडला होता. या घटनेबाबत वेगवेगळ्या संघटनांकडून कारवाईची करण्याची मागणी होत आहे. अशातच या लाजिरवाण्या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP Protest In SPPU) विद्यापीठात आंदोलन केले. यावेळी ABVP चे विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

व्यसनमुक्त विद्यापीठ झालंच पाहिजे, भारत माता कि जय अशी घोषणाबाजी करत विद्यार्थी आक्रमक झाले. यावेळी पोलीस आणि ABVP च्या विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळले. आंदोलकांनी झेंडे घेऊन घोषणाबाजी करत प्रवेशद्वारावर आंदोलन केले. त्यानंतर खाली बसून घोषणाबाजीही केली. जोपर्यंत विद्यापीठ कारवाई करत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यापीठ प्रशासन जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी यावेळी केला.

काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृह क्रमांक 8 मध्ये तब्बल 750 ग्रॅम गांजा सापडला होता. विद्यापीठ प्रशासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु प्रशासन हे प्रकरण दडपत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. तसेच याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. ही घटना 14 मे रोजी समोर आली होती. एवढा गंभीर प्रकार घडल्यानंतर देखील विद्यापीठ प्रशासन यावर कठोर कारवाई करत नसल्याचे समोर आले. या घटनेला दहा दिवसांचा कालावधी लोटला त्यानंतरही कोणतेच ठोस पाऊस उचलले नाही. केवळ या प्रकरणावर चौकशी समिती नेमण्यात येईल असं सांगण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.